Friday, 27 August 2021

‘सफरचंद’ नावाची उत्पत्ती.


‘सफरचंद’ नावाची उत्पत्ती.

‘सफरचंद’ या शब्दाच्या उच्चारात ताज्या रसरशीत सफरचंदाचा तुकडा दातांनी तोडताना जो विशिष्ट आवाज होतो तसा एक नाद आहे. हा शब्द कोठून आला असेल याचे मला नेहमी कुतूहल वाटे. कारण फारशी भाषेत सफरचंदाला 'सेब' असे नाव आहे. हिंदी उर्दू मध्येही सेबच म्हणतात. मग एखाद्या ढेरपोट्या गोबऱ्या गालाच्या शेटजीला शोभावं असं हे 'सफरचंद' नाव आलं कुठून असावं असा प्रश्न मलाच काय अनेकांना अनेक वेळा पडलेला आहे. त्याचं उत्तर अचानकच सापडलं. 
मदिना शहरी सौदी अरेबियात. तिथल्या एका मॉलमध्ये 'सफरजल' या नावाच्या पाटीखाली पेअरसारखी पिवळी फळं मांडून ठेवलेली पहावयास मिळतात. . पण ती काही सफरचंदं नाहीत . त्या रसरशीत पिवळ्या लवदार त्वचेच्या फळांना आपल्याकडे ‘बिही’ असे म्हणतात असे पुढे समजले. थोडीफार नाशपतीसारखी दिसणारी ही फळं पण आपल्याकडच्या सफरचंदाच्या जवळचं वाटावं असं ‘सफरजल’ हे नाव त्या फळांना होतं. आपण ज्याला ‘सफरचंद’ म्हणतो त्याला मात्र अरबीत 'तुफैहा' असं नाव आहे. मग सफरचंद हे नाव आलं कुठून ? सफरचंदाला गुजराती लोक 'सफरजन' म्हणतात. हे सफरजल नावाच्या अगदी जवळ जाणारं नाव. माझ्यामते गुजराती व्यापाऱ्यांनी हे नाव उचललं असावं. गुजरात्यांनी हे नाव त्यांच्या सुरत वैगेरे बंदरांवरून मध्यपूर्वेच्या प्रदेशांशी चालणाऱ्या अरबी व्यापाऱ्यांकडून ऐकलेलं असू शकेल. या फळांची बंदरांवरून आवक-जावक असावी. किंवा सुरतेवरून हजयात्रेसाठी जाणं-येणं करणाऱ्या यात्रेकरूंनी हि फळं नावासकट प्रसिद्ध केली असावी. मोहम्मद पैगंबरांनी सफरजन फळांची महती सांगणाऱ्या हदीस प्रसिद्ध आहेत. सफरचंदची फळं भारतात जेव्हा सर्वदूर पोहोचली तेव्हा गुजरात्यांनी आधीचाच 'सफरजन' हा शब्द त्यासाठी वापरात घेतला. मराठी लोकांनी गुजराती 'सफरजन' चे शेठीया नावाच्या जवळ जाणारे रूपांतर करून 'सफरचंद' केले. रायचंद, हिराचंद, लखीचंद सारखे सफरचंद. 

जगात सर्वप्रथम सफरचंदं माहित होती आणि त्यांची लागवड केली जात होती ती कज़ाख़िस्तानाच्या डोंगराळ भागात. तिथून हे फळ जगभर पसरले. तिथल्या स्थानिक कीटकांनी परागण करून इतक्या वेगवेगळ्या जातीची सफरचंदं या प्रदेशात उत्पन्न केली आहेत कि संशोधक आजही नव्या सफरचंदाच्या जातीच्या शोधात या प्रदेशात फिरत असतात. हे प्राचीन फळ आहे. सफरचंद हे ज्ञानवृक्षाचं फळ म्हणून प्रसिद्ध. बायबलमध्ये परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध आदम आणि इव्ह हे फळ खातात आणि स्वर्गातून हाकलून दिले जातात अशी कथा आहे.
 
आपल्याकडे काश्मीरमध्ये सफरचंदं होती पण भारतभर हि फळं कुणाला जास्ती माहिती नव्हती. काश्मीरात सफरचंदं होती पण ती जंगली जातीची. ब्रिटिशांनी हौसेनं आणून सफरचंदांची रोपं रुजवलेली पण ब्रिटिशांना आवडणारी सफरचंदं आंबट असल्यामुळे ती इतकी प्रसार पावली नाहीत. सफरचंदं भारतभर इतकी सर्वज्ञात झाली त्याचे श्रेय जाते सॅम्युएल स्टोक्स या अमेरिकन भारतीयास. 

या स्टोक्सची कहाणी सफरचंदाच्या व्युत्पत्तीपेक्षाही रोचक आहे. वयाच्या विसाव्या वर्षी एका श्रीमंत अमेरिकन उद्योगपतीचा हा मुलगा भारतात स्वतःचा अध्यात्मिक शोध घेण्यासाठी आला. शिमल्यात राहून कुष्ठरोग्यांची सेवा केली. तिथले अठरा विश्वे दारिद्र्य, अन्नान दशा पाहून त्या लोकांसाठी काहीतरी करायचे ठरवले. अमेरिकेत सफरचंदाच्या लागवडीसाठी जसे पोषक हवामान आहे तसेच ते शिमल्याच्या आसपासही आहे हे स्टोक्सच्या लक्ष्यात आले आणि इथे उत्तम आणि मोठ्या प्रमाणात सफरचंदाची लागवड केली जाऊ शकते आणि तसे झाले पाहिजे हा ध्यासच स्टोक्सने घेतला. तो अमेरिकेला गेला आणि फिलाडेल्फीयाहुन उत्तमोत्तम सफरचंदांची रोपं घेऊन भारतात परतला. आधी स्वतः लागवड केली आणि ती रोपं हळूहळू सर्व हिमाचल प्रदेशात प्रसार पावली. आज भारत सफरचंदांची निर्यात करणारा मोठा देश आहे. डोंगराळ प्रदेशातल्या लोकांची गरिबी दूर करण्यात स्टोक्सचा वाटा थोर आहे. 

पुढे स्टोक्सने गांधीजींच्या प्रेरणेने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. सत्यानंद हे नाव स्वीकारले आणि या मातीतल्या लोकांसाठी काम करत देह ठेवला. अमेरिकेने भारतास दिलेला आणि पुढे अस्सल भारतीय झालेला हा जॉनी ऍपलसीड आहे. या सत्यानंद स्टोक्सची परवा जयंती होती त्यांना आणि त्यांच्या कार्याला सलाम.



मिलिंद आरोलकर.

फोटो स्त्रोत गुगल -

Wednesday, 25 August 2021

डालड्याचा शोध एका मराठी माणसाने लावला होता.




फोटो स्त्रोत गुगल -

डालड्याचा शोध एका मराठी माणसाने लावला होता.


डालडा सगळ्यानाच माहित आहे. एकेकाळी हे पिवळे डब्बे प्रत्येकाच्या घरात दिसायचे. साजूक तुपाचा सबस्टीट्युट असलेला हा डालडा मोकळा झाल्यावर भरपूर कामासाठी उपयोगी पडायचा. तो आपल्या जेवणाशी आणि जीवनाशी एवढा जोडला गेला होता की डालडा हा एक ब्रँड आहे आणि पदार्थाच नाव वनस्पती तूप आहे हे आपण विसरूनच गेलो होतो.

हो वनस्पती तूप. एकेकाळी याच वनस्पती तूपाने अख्ख्या दुसऱ्या महायुद्धात सैनिकांना जगवल होतं. पण गंमत अशी की आपल्या पैकी प्रत्येकाला वाटत की हे वनस्पती तूप परदेशात शोधलं गेलंय. तर तस नाही. वनस्पती तुपाचा शोध एका मराठी माणसाने लावला आहे.

नारायणराव बाळाजी भागवत.

भागवत घराणे हे मुळचे पंढरपूरचे. घरात अगदी गर्भश्रीमंती होती. पण नारायणरावांचे वडील त्यांच्या वडिलांशी भांडून निराधार अवस्थेत मुंबईस आले. तिथेच हमाली वगैरे करून शिक्षण घेतल. मट्रीकच्या परीक्षेवेळी कष्टाने त्यांना मानाची ‘जगन्नाथ शंकरशेठ’ शिष्यवृत्ती मिळाली. आपल्या मेहनतीने शिक्षण पूर्ण करून ते वकील झाले. नंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. नंतर बाळाजी भागवत इंदोरच्या होळकर संस्थानचे दिवान बनले.

बाळाजी भागवतांची पत्नी ही त्या काळातली म्हणजे एकोणिसाव्या शतकातली मॅट्रिक होती आणि इंग्रजी पुस्तके वाचणे हा तिचा छंद होता.

अशा सुशिक्षित माता-पित्यांच्या पोटी नारायणरावांचा जन्म १८८६ मध्ये झाला. नारायणराव व त्यांची भावंडे अभ्यासात हुशार होते. नारायणरावांनादेखील आपल्या वडिलांच्या प्रमाणे ‘जगन्नाथ शंकरशेठ’ स्कॉलरशिप मिळवायची होती. त्यासाठी ते संस्कृत भाषेचा अभ्यास फार जोमाने करत होते. पण त्यांच्याच एका आप्ताने त्यांना सांगितले,

‘नारायणा, तुझी आíथक स्थिती उत्तम आहे, तुझे शिक्षण तुझे आई-वडील सहज करू शकतात. त्यामुळे उगीचच जगन्नाथ शंकरशेठ मिळवून तू दुस-या एका हुशार पण गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशाअभावी अडवू नकोस आणि जो काही अभ्यास करशील तो आनंदासाठी कर, काही मिळवायचे असे ध्येय ठरवून करू नकोस’

हा सल्ला नारायणरावांना जन्मभर मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरला. नारायणराव भागवतांनी मुंबईच्या झेवियर्स कॉलेजमधून रसायनशास्त्रात डिग्री घेतली. याच काळात सर जमशेदजी टाटांच्या संकल्पनेतून कर्नाटकातील बेंगलोरमध्ये ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ची स्थापना झाली होती.

भारतातील हे पहिले मुलभूत संशोधन केंद्र होते. नारायणरावांनी तिथल्या पहिल्याच बॅचमध्ये प्रवेश घेतला. रसायनशास्त्रात त्यांनी ऑईल्स आणि फॅट्स यावर संशोधन केले.

ते टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सची संशोधन पदवी पूर्ण करणारे पहिले विद्यार्थी ठरले. त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या भावाने देखील याच संस्थेत प्रवेश घेतला.

पासआउट झाल्यावर नारायणराव येमेन देशातील एडनला गेले. तिथे त्यांच्या वडिलांच्या मित्राचा इब्राहीमभाई लालजी यांचा साबणाचा कारखाना होता. तिथे त्यांना मदत करण्यास सुरवात केली. त्यांच्याच घरात त्यांच्या मुलासारखे राहिले.

पुढे १९१९ मध्ये पत्नीचे निधन झाल्यावर ते भारतात परत आले. भारतात आल्यावर टाटा ऑईल मिल्स येथे कंपनीचे डायरेक्टर कपिलराम वकील यांचे मुख्य मदतनीस म्हणून ते नोकरी करू लागले.

पहिल्या महायुद्धाचा हा काळ होता. सैनिकांना लोण्याची आवश्यकता असायची. पण ते सर्वाना पुरवण शक्य नव्हतं. थिजवलेल्या तेलापासून लोण्याचा स्वस्त पर्याय म्हणून मार्गारीन सैन्यात वापरायला लागले. ते लोकप्रिय झाले व ते स्वस्त असल्यामुळे मागणी वाढत गेली.

पण भारतीय सैनिकाकडून मात्र या मार्गारीन पेक्षा तुपाची मागणी जास्त व्हायची.

याच काळात जगभरातील संशोधक साजूक तुपाला पर्याय शोधण्याच्या मागे लागले होते. विशेषतः अमेरिका व जपान मध्ये गोडेतेलापासून तूप तयार करण्याचे प्रयत्न सुरू होते, पण त्यांना यश मिळत नव्हते. पण टाटा कंपनीमध्ये नारायणराव भागवत आणि कपिलराम या दोघांनी त्यात यश मिळवले.

पहिले नैसर्गिक तूप भारतात तयार झाले.

ही गोष्ट टाटा कंपनीचे वित्तीय सल्लागार असलेल्या पीटरसन या गोऱ्या अधिका-याला कळली. त्याने या कृतीची मागणी त्यांच्याकडे केली. पण भागवत आणि कपिलराम उत्तरले,

‘‘या क्षेत्रात आम्ही शोधकर्ते ठरलो आहोत तर मग त्याचा फायदा आमच्या देशालाच झाला पाहिजे. आमच्या देशालाच त्याचे श्रेय मिळायला हवे’’.

इंग्रजांच्या सत्तेचा काळ होता. आपण ज्यांच्यावर राज्य करतो ते भारतीय लोक आपली आज्ञा मानत नाहीत याचा राग त्या पीटरसनच्या मनात आला. त्याने थेट टाटांच्या या कंपनीची आर्थिक नाकेबंदी केली. टाटांना ही कंपनी बंद करावी लागली.

कपिलराम आणि नारायणराव दोघेही बेकार झाले. जवळपास सातवर्ष नारायणराव बेकार होते. अमेरिकेतील एक अतिशय चांगल्या पगाराची नोकरी त्यांना चालून आली होती पण ‘वनस्पती तुपाच्या’ शोधाचे श्रेय त्यांना आपल्या देशालाच द्यायचे या हट्टापायी त्यांनी नाकारली.

याकाळात त्यांच्या एका बहिणीने आपल्या शिक्षिकेच्या नोकरीतून त्यांच अख्खं कुटुंब संभाळल.

अखेर सात वर्षानी कपिलराम यांनी गुजरातमध्ये सॉल्ट कंपनी सुरु केली व नारायणरावांना तिथे नोकरी मिळाली. या दोघांच्या जोडीने तिथेही रसायनशास्त्रात अनेक महत्त्वाचे शोध लावले. पुढे ही कपिलराम यांची कंपनी टाटांनी विकत घेतली आणि तिचे नाव ठेवलं

‘टाटा केमिकल्स’. टाटा केमिकल्सची मुख्य जबाबदारी कपिलराम आणि नारायणराव यांच्याकडेच होती.

सर्व घडी नीट बसलेली असतानाच अचानक नारायणरावांना गुजरात सोडून परत यावं लागलं. त्याच्या वडिलांना पॅरालीसीसचा झटका आला होता. मुंबईत येऊन त्यांनी आपले मित्र अनंतराव पटवर्धन यांच्याबरोबरसाबण आणि बाकीच्या कंपन्यांना लागणारी केमिकल्स बनवणारी ‘अनार अँड कंपनी’ सुरू केली.

याच काळात लिव्हर ब्रदर्सनी भारतात हिंदुस्तान वनस्पती मॅन्युफ्कचरिंग नावाची कंपनी स्थापन केली होती.

त्यांनी डाडा या डच कंपनीबरोबर करार केला आणि भारतात सेवर येथे वनस्पती तूप बनवणारी फॅक्ट्री सुरु केली. हे वर्ष होतं १९३७. पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना संपूर्ण जगभरात वनस्पती तूप पाठवण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि तिथून वनस्पती तूप म्हणजे डालडा हा अगदी समानार्थी शब्द पडून गेला,
वनस्पती तुपाचा शोध नारायणराव भागवत यांनी लावला होता हे जगाबरोबरच आपण ही विसरून गेलो.

नारायण राव भागवतांच्या मुलीनीही त्यांच्या घरची उच्च शिक्षणाची परंपरा पुढे नेली. त्यांच्या दोन्ही मुली म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका दुर्गा भागवत आणि भारतातल्या पहिल्या डॉक्टरेट मिळवणाऱ्या कमलाबाई भागवत सोहनी. त्यांच्या रूपाने भागवत कुटुंबाच नाव अजरामर राहिले आहे.




मिलिंद आरोलकर -

फोटो स्त्रोत गुगल -

Sunday, 15 August 2021

लग्नासाठी मोठ्या अपेक्षा मुलींच्या.




मुलीचे पालक :- पगार किती आहे?,
स्वत:चे घर आहे का?
गावी शेती आहे का? 
कार आहे का ?,
अजून कुठे इन्व्हेस्टमेंट केली आहे का?
बहिणींची लग्न झाली आहेत का?
आई-वडिल कुठे असतात ?

मुलगा : मुलगी काय करते ?

 मुलीचे पालक  : डिग्री झालीये नोकरी शोधत आहे, 
डिप्लोमा कोर्स करतीये ,
आधी करत होती ,
लग्नाचं चाललय म्हणून सोडलंय, आता २- ३ महिन्यात
लगेलच ऑफिस लांब पडतय
 म्हणून सोडलाय, घरीच असते तिला गृहसजावटीच्या 
आवड आहे .

 मुलगा  :- *मग तुम्ही अस स्थळ का नाही शोधत* जो मुलगा नोकरी शोधतोय किंव्हा ज्याला पुढे लागणार आहे? 
काका एक साधी गोष्ट आहे 
जर मुलाकडे नोकरी,
घर,
शेती, 
गाडी नसेल तर तुम्ही *तुमची मुलगी द्याल का?*

 नाही ना ?
तर मग  मुलीकडे काहीही नसताना मुलाने का करावे अशा मुलीशी लग्न? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 
पगार माझा ,
घर माझं ,
शेती माझी,
कार माझी,
कष्ट माझे,
इन्व्हेस्टमेंट माझी.
मी काय मूर्ख आहे काय तुमच्या मुलीला फुकट पोसायला.
पूर्वीचा जमाना गेला काका जेव्हा पुर्वीचे लोक हुंडा द्यायचे व 
घ्यायचे,
आता जमाना बदललाय ,
तुम्ही तुमच्या स्वप्‍नातल्या अपेक्षा बदला आणि 
हो महत्त्वाचे म्हणजे तुमची मुलगी घरी येऊन काय
 आयत्या पिठावर रेघोट्या 
मारनार का?
मुलीची बाजु म्हटले की 

 लग्नानंतर करेल की ,
शिकेल की ,
होईल की,
जमेल की,
 लागेल की,
बघु की.

पण तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मुलगा मात्र रेडीमेड तयार पाहिजे,
कुठेही कमी नको,
असं कसं चालेल काका.
साधी गोष्ट आहे काका तुम्हाला जसे सर्वगुणसंपन्न मुलगा हवाय मग मुलाकडचे ही सर्वगुण संपन्न मुलगीच बघणार ना.

मुलीं कडच्यांना अजूनही कळत नाहीये कि लग्नाचे स्वरूप बदलत्या काळानुसार पूर्णपणे बदलले आहे. ते अजूनही मुलगी द्यावी श्रीमंत घरी
आणि सून आणावी गरीब घरची  या आधारावर स्थळे शोधात आहेत आणि याउलट 
मुलाकडील अगदी 
प्रैक्टिकल विचार करून ,
 जो कष्ट करतो त्याच्याच घरी लक्ष्मी वास करते  या आधारावर स्थळे 
शोधात आहेत. 
समोरून चालून आलेले स्थळ 
मुलींकडचे युद्धाट उत्तर देऊन नकार देताहेत का तर कोणीतरी
 करोडपती/श्रीमंत स्थळ येऊन माझ्या मुलीला येऊन घेऊन जाणार आहे 
आशा 'स्वप्नांच्या दुनियेत अजूनही आहेत. 
मुली आणि त्यांचा पालक भारी-भारी श्रीमंत वेल-सेटल स्थळ शोधून काढतायेत आणि फोन करतात जेन करून मुलीला पुढे कोणतेही त्रास नको.

मुलाकडील फक्त आणि 
फक्त मुलींबद्दल विचारणा करतात आणि मुलींकडच्या
  पगार,
घर,
शेती,
बहिणीची लग्न,
आई-वडिल कुठे असतात, ईन्वेस्टमेन्ट आणि अजून 
बरंच काही. 
मग मुलांनो व्यक्ती म्हणून तुम्हाला काय महत्त्व ? 
तुमचा उपयोग मग काय 
फक्त एटीएम मशीन का?
मुलांनो एक साधा गोष्ट आहे ,
जर तुम्हाला बारावीला 
चाळीस-पन्नास टक्के पडले तर 
पुढील शिक्षणासाठी चांगले कॉलेज मिळेल का? नाही ना?
 मुलींच काय आहे ना की स्वतःला पडलेत चाळीस-पन्नास टक्के 
आणि एडमिशन हवंय हार्वर्ड यूनिवर्सिटी मध्ये.

 मुलांनो खालील खर्चाचा 
कधी विचार केलाय का?

 १. शहरातील एक मुलाच्या
 शिक्षणाचा खर्चा 
(ग्रेजुएशन पर्यन्तच फक्त १२ + ४ ) इथून पुढे ,
कमीत कमी २० लाख. बाकीचे खर्चा अजून वेगळेच. जुळे झाले तर मग डबल धमाका.

२. आई-वडिलांचा (म्हातारपणात) आजाराचा खर्च
 (वाढत्या वयानुसार बीपी, शुगर, दातांच्या समस्या, संधिवात, डोळ्यांची दृष्टी, अजूनही काही गंभीर आजार व त्यांचा खर्च विचार न केलालाच बरा )  

३. मुलांच्या (लहान वयात) सर्दी,खोकला,ताप,आजाराचा खर्च, 
डायपरचा खर्च (कमीत कमी तीन वर्षभर दररोज), 
वर्षभरातील नियमित तपासणी.

४. बायकोच्या व स्वत:चा 
घरातील कार्यक्रम – 
नातेवाईकाचे लग्न (आहेर), 
लहान मुलांचे वाढदिवस (गिफ्ट् खर्च) , 
डोहाळजेवन , सुपारी कार्यक्रम ,गावाला जाणे येणे ,
 कार्यक्रमासाठी नवीन
 कपडे खरेदी आणि 
या सर्वांचा पेट्रोल ,टोलखर्च.

५. मित्रमैत्रिणीचे कार्यक्रम –
 लग्न (आहेर),
लहान मुलांचे वाढदिवस (गिफ्ट् खर्च) , 
डोहाळजेवन , 
सुपारी कार्यक्रम ला जाणे येणे , कार्यक्रमासाठी 
नवीन कपडे खरेदी आणि 
या सर्वांचा पेट्रोल ,टोलखर्च.

६. महिनाभराचा मोबाइल रिचार्ज' , डिश टीव्ही, कामवाली, महिनाभराचा बाजार, पेट्रोल ,सोसायटी मेण्टेनन्स.

७. साधे बाहेर जेवायला बसले तर एक हजार रुपये पुरत नाहीत.

८. घराचे हफ्ते कमीत कमी 
२० वर्षे ते पण नोकरी असेल तोपर्यंत.
 
बघितले ना सगळी अवघड कामे मुलाकडे आणि
*मुलींकडच्याना हे सगळं सोपच वाटतंय,*

 महागाईचा आलेख
दिवसेंदिवस वाढतच चाललंय
  पण आमची मुलगी 
काहीच करणार नाही जे काही करायचं ते मुलगाच करेल. 
स्वत:चं घर हे मुलगाच घेणार, 
कार ही मुलगाच घेणार, 
मुलांच्या शिक्षणाचा खर्च 
 हे मुलगाच करणार ,
संसार मुलगाच करणार, 
का संसार फक्त मुलाचाच आहे का? 
*मग मुलगी घरी कायकरणार?*
 मुलींची आणि त्यांच्या पालकांची जी अपेक्षा आहे ना 
की श्रीमंत घरी जायचंय 
ते बंद करा मुलांनो , 
मुलींना झाडवरुन 
खाली उतरवणाचे काम तुमचे आहे
 
मुलांनो लक्षात ठेवा सगळ्या 
 चाव्या तुमच्या हातात आहेत
 आणि तुम्ही मूर्खासारखे 
खुप अवघड आहे म्हणून
 रडतबसलय.
तुमचीच शेती/कष्ट/कार/पगार/घर ,तुम्हालाच ठरवायचयं कि पुढे जायचंय कि नाही ,
आणि तुम्हाला घरी नवीन सदस्य आणायचाय ना मग तुम्हीच जास्त पारखले पाहिजे ना ?
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलींना घरी बसून खायची पद्धत बंद करा .
मुली बऱ्याच गोष्टीत आधुनिक झाल्यात ,
तुम्ही त्याच 
जुन्या जमान्यातअजून जगताय. मुलांनो जवळजवळ सगळ्याच मुलींना श्रीमंताच्या घरी जायचंय जरा लघु उद्योजक,
शेतकरी,
छोटे दुकान व्यापारी, 
कमी पगार असणारे इंजीनियर / डॉक्टर/वकील/रिसेप्शनिस्ट/ऑफिसबॉय/सेक्युरिटी गार्ड/ शिपाई यांच्याशी कोण लग्न करणार,का त्यांना मन/इच्छा नाही का.?
 
मुलींच्या अपेक्षा खुप वाढल्यात असे बोलुन चालणार नाही.
जो पर्यंत मुलेही त्यांच्या अपेक्षा वाढवत नाहीत ना आणि मुलींना स्पष्टपणे 
सांगत नाही ना की 
आम्ही आमच्याच लेव्हलचेच स्थळ पाहतोय /तुमच्या अपेक्षा खुप जास्त आहेत, 
तोपर्यंत हे असेच चालत राहील.
मुलांनो जर तुम्हांला नोकरी नसेल तर कोणी मुलगी देईल का?,
चांगला पगार नसेल तर 
कोणी मुलगी देईल का? 
जर तुमच्याकडे शेती नसेल तर कोणी मुलगी देईल का? 
जर तुमच्याकडे स्वतःचे घर नसेल तर कोणी मुलगी देईल का? 
मग मुलीकडेही या गोष्टी नसतील तर मग मुलानं का करावे आशा स्थळाशी लग्न?
मुलांनो त्यामुळे वेळीच जागे व्हा 
आणि मुलीकडचयांनाही 
कळू द्या कि चांगले स्थळ हवे असेल तर आपली आणि आपल्या मुलीचीही तेवढीच लायकी हवी. 

 *सर्वात महत्वाचे* 

लग्न करणाऱ्या मुलांना व
 मुलांच्या पालकांना एक
 नम्र विनंती स्वतःची 
*सर्वप्रॉपर्टी/शेतजमीन/ईन्वेस्टमेन्ट/आई- वडिलांचा पगार/पेन्शन बायोडाटा मधे अजिबात टाकु नये*
 किंवा सांगू नये,
फक्त मुलाचा पगार आणि राहते घर स्वतःचे आहे ऐवढेच सांगणे.
आज-काल दुष्प्रवृत्ति 
आणि सिज़नल मैरिज करणारे लोक खुप वाढत चालले आहेत,
लग्न फायनल झाल्यावर 
किंवा लग्न झाल्यानंतरच 
अशा गोष्टी शेअर करणे.
ते तुमच्यासाठी खुपखुप महत्वाचेआहे.
लक्षात ठेवा क्षणिक आनंद 
देणाऱ्या गोष्टीच जास्त
 दुःख देतात आणि एवढ सगळं मिळाल्यावर मुलगी घरी करणार काय ? 
याचा जरा आपण विचार करायला हवा.
या सगल्या गोष्टी तुम्ही 
जर सांगितल्या तर
 तुम्ही स्वतः मुलीला आयतं बसून खायच आमंत्रण देताय हे लक्षात ठेवा.


मिलिंद आरोलकर.

Tuesday, 20 July 2021

to write the whole constitutiion famous calligraphy writer prem bihari narayan rayzada




not many of us know that the constitution of india was written by hand. 
no instrument was used to write the whole constitution. 

prem bihari narayan rayzada, a resident of delhi, wrote this huge book, the entire constitution, in italic style with his own hands.

prem bihari was a famous calligraphy writer of that time. he was born on 16 december 1901 in the family of a renowned handwriting researcher in delhi. he lost his parents at a young age. he became a man to his grandfather ram prasad saxena and uncle chatur bihari narayan saxena. his grandfather ram prasad was a calligrapher. he was a scholar of persian and english. he taught persian to high-ranking officials of the english government.

dadu used to teach calligraphy art to prem bihari from an early age for beautiful handwriting. after graduating from st. stephen's college, delhi, prem bihari started practicing calligraphy art learned from his grandfather. gradually his name began to spread side by side for the beautiful handwriting. when the constitution was ready for printing, the then prime minister of india jawaharlal nehru summoned prem bihari. nehru wanted to write the constitution in handwritten calligraphy in italic letters instead of in print. 


that is why he called prem bihari. after prem bihari approached him, nehruji asked him to handwrite the constitution in italic style and asked him what fee he would take.

prem bihari told nehruji “not a single penny. by the grace of god i have all the things and i am quite happy with my life. ” after saying this, he made a request to nehruji "i have one reservation - that on every page of constitution i will write my name and on the last page i will write my name along with my grandfather's name." nehruji accepted his request. he was given a house to write this constitution. sitting there, premji wrote the manuscript of the entire constitution.

before starting writing, prem bihari narayan came to santiniketan on 29 november 1949 with the then president of india, shri rajendra prasad, at the behest of nehruji. they discussed with the famous painter nandalal basu and decided how and with what part of the leaf prem bihari would write, nandalal basu would decorate the rest of the blank part of the leaf.

nandalal bose and some of his students from santiniketan filled these gaps with impeccable imagery. mohenjo-daro seals, ramayana, mahabharata, life of gautam buddha, promotion of buddhism by emperor ashoka, meeting of vikramaditya, emperor akbar and mughal empire, empress lakshibai, tipu sultan, gandhiji's movement, netaji subhas chandra bose and rupachitra is all reflected in their drawing ornaments. 

all in all, it is a pictorial representation of the history and geography of india. they painted the pictures very thoughtfully according to the content and paragraphs of the constitution.

prem bihari needed 432 pen holders to write the indian constitution and he used nib number 303. the nibs were brought from england and czechoslovakia. he wrote the manuscript of the entire constitution for six long months in a room in the constitution hall of india. 251 pages of parchment paper had to be used to write the constitution. the weight of the constitution is 3 kg 650 grams. the constitution is 22 inches long and 16 inches wide.


prem bihari died on february 17, 1986. the original book of the indian constitution is now preserved in the library of the parliament house, delhi. later, a few books were published in print under the supervision of the survey of india in dehradun.


Milind Arolkar.

Monday, 19 July 2021

भारतीय राज्यघटनेचे सुलेखनकार - प्रेमबिहारी नारायण रायजादा


भारतीय राज्यघटनेचे सुलेखनकार - प्रेमबिहारी नारायण रायजादा.


आपल्यापैकी बर्‍याचजणांना माहित नाही की भारताची राज्यघटना हातांनी लिहिलेली आहे.
संपूर्ण संविधान लिहिण्यासाठी कोणतेही साधन वापरले गेले नाही.

दिल्लीतील रहिवासी प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी स्वत: च्या हातांनी हा संपूर्ण ग्रंथ संपूर्ण संविधान लिहिलेे आहे .

प्रेम बिहारी हे त्या काळातील प्रसिद्ध सुलेखन लेखक होते. त्याचा जन्म १ डिसेंबर १९०१ रोजी दिल्ली येेथे प्रसिद्ध लेखन संशोधकांच्या कुटुंबात झाला. तरुण वयातच त्याने त्याचे आईवडील गमावले. ते आजोबा राम प्रसाद सक्सेना आणि काका चतुर बिहारी नारायण सक्सेना यांच्या समवेत राहत. त्याचे आजोबा राम प्रसाद हे सुलेखक होते. ते पर्शियन व इंग्रजी भाषेचा अभ्यासू होते. त्यांनी इंग्रजी सरकारच्या उच्चपदस्थ अधिकााऱ्यांनाां पर्शियन भाषेचे शिक्षण दिले.
 आजोबा रामप्रसाद सक्ससेना त्यांना लिखाणातून लहानपणापासूनच प्रेमबिहारीना साकारण्यासाठी कॅलिग्राफी कला शिकवत असत. इयत्ता पहिलीनंतर. स्टीफन कॉलेज, दिल्ली येेेेथे प्रेम बिहारी यांनी आजोबांकडून शिकलेल्या सुलेखन कलेचा सराव करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याचे नाव सुंदर लिखाणांकरिता चोहोबाजूने पसरू लागले. घटना छपाईसाठी तयार झाल्यावर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी प्रेमबिहारी बोलावले. नेहरूूूूनां प्रिंटऐवजी हस्तलिखित कॅलिग्राफीमध्ये संविधान लिहिलेले हवे होते.

म्हणूनच त्याने प्रेम बिहारी बोलावले.. प्रेम बिहारी त्यांच्याकडे गेल्यानंतर पंं.नेहरूजींनी त्यांना घटनेस इटेलिक शैलीत हस्ताक्षर करण्यास सांगितले आणि त्यांनी कोणती फी घ्यावी असे विचारले.

प्रेम बिहारी नेहरूजींना सांगितले “एक पैसाही नाही. देवाच्या कृपेने माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत आणि मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे. "असे बोलल्यानंतर त्यांनी नेहरूजींना विनंती केली की" माझी एक इच्छा आहे , प्रत्येक पानावर मी माझे नाव लिहीन आणि शेवटच्या पानावर मी माझे नाव माझ्या आजोबांच्या नावासमवेत लिहीन. " पं.नेहरूजींनी त्यांची विनंती मान्य केली. हे संविधान लिहिण्यासाठी त्यांना घर देण्यात आले होते. तिथे बसून प्रेमजींनी संपूर्ण घटनेचे हस्तलिखित लिहिले.

लिखाण सुरू करण्यापूर्वी, पं.नेहरूजींच्या आदेशानुसार प्रेम बिहारी नारायण २९ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे तत्कालीन अध्यक्ष श्री राजेंद्र प्रसाद यांच्यासमवेत शाांतीनिकेतन येथे आले. त्यांनी प्रख्यात चित्रकार नंदालाल बासु यांच्याशी चर्चा केली आणि पानाच्या प्रेम बिहारीच्या कोणत्या भागावर लिहायचे आणि नंदालाल बसू पानाच्या उर्वरित रिक्त भागाची सजावट करतात हे ठरविले.

नंदलाल बोस आणि त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी शाांतीनिकेतनमधील निर्दोष प्रतिमांनी ही पोकळी भरून काढली. मोहेनजो-दारोची मुद्रा, रामयाण, महाभारत, गौतमबुद्धांचे जीवन, सम्राट अशोकानेे बौद्ध धर्माची घेतलेली दीक्षा , विक्रामादित्यची बैठक, सम्राट अकबर व मुघल साम्राज्य, महारानी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान, गांधीजींची चळवळ, नेताजी सुभाष चंद्र बोस व रुपकचित्रेे या सर्वांचा समावेश आहे. त्यांचे रेखाचित्र दागिने.

एकूणच हे भारताच्या इतिहासाचे आणि भौगोलिक चित्रांचे प्रतिनिधित्व करीत आहे. घटनेतील मजकूर आणि परिच्छेदांनुसार त्यांनी चित्रे अतिशय विचारपूर्वक रंगविली.

प्रेम बिहारी यांना भारतीय संविधानाचे सुलेखन लिहिण्यासाठी ४३२ पेनांची आवश्यकता होती आणि त्यांनी ३०३ नीब याकरिता वापरल्या . निबांना इंग्लंड आणि चेकोस्लोवाकियामधून आणले गेले. त्यांनी भारतीय संविधान मंडळाच्या एका खोलीत संपूर्ण घटनेचे हस्तलिखित सहा महिने ठेवले. संविधान लिहिण्यासाठी २५१ पानांच्या चर्मपत्र कागदाचा वापर करावा लागला. घटनेचे वजन ३ किलो ६५० ग्रॅम आहे. घटना २२ इंच लांबी आणि १६ इंच रुंद आहे.

१ फेब्रुवारी, १९८६ रोजी प्रेम बिहारी यांचे निधन झाले. भारतीय राज्यघटनेचे मूळ पुस्तक आता संसद भवन, दिल्लीच्या ग्रंथालयात जतन केले गेले आहे. नंतर, देहरादून मधील भारतीय सर्वेक्षणांच्या देखरेखीखाली काही पुस्तके छापण्यात आली आहेेत.



मिलिंद आरोलकर.

Wednesday, 14 July 2021

१५ जुलै १९२६:- मुंबईत बेस्ट बस सुरू झाली.




१५ जुलै १९२६:- मुंबईत बेस्ट बस सुरू झाली

बेस्ट (बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम) बस वाहतूक सुरु झाली.
बेस्ट ही भारतातल्या सगळ्यात मोठ्या शहरी परिवहन सेवांपैकी एक मानली जाते. मुंबईच्या कुठच्याही भागात जायला बेस्टची सेवा आहे. नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर अशा बाजूच्या शहरांमध्येही बेस्टची सेवा आहे. भारतातल्या काही नफ्यामध्ये असणार्‍या विद्युत मंडळांपैकी एक नाव म्हणजे "बेस्ट". बेस्ट ही (बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम) मुंबईची दळणवळण व विद्युत सार्वजनिक पुरवठा कंपनी आहे. बेस्टचा जन्म इ.स. १८७४ मध्ये ट्रामवे कंपनीच्या रूपात झाला. आपल्या ट्राम गाड्यांना वीज पुरवता यावी म्हणून बेस्टने वाडीबंदर (नंतरचे बोरीबंदर आणि आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथे नोव्हेंबर १९०५ मध्ये औष्णिक वीज केंद्र स्थापन केले त्यातूनच पुढे बेस्टवर मुंबईला वीजपुरवठा करण्याची जवाबदारी आली. १९४७ मध्ये देश स्वतंत्र होण्याच्या एक आठवडा आधीच बेस्ट मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आली आणि आता महानगरपालिकेच्या अखत्यारीत असूनही, बेस्टचा स्वंतंत्र असा कारभार चालतो.
मुंबई शहराच्या इतिहासात १९ वे शतक अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या शतकाने सात बेटांच्या या शहरात खूप महत्त्वाचे बदल घडवून आणले. ही सात बेटे एकत्रित करून भौगोलिकदृष्टय़ा त्यांचे एक शहर करण्याची प्रक्रिया १८३०मध्ये म्हणजे १९व्या शतकाच्या पूर्वार्धात पूर्ण झाली. त्यानंतर या शतकाच्या उत्तरार्धाची सुरुवात होतानाच १८५३ मध्ये मुंबईत रस्ते आणि रेल्वे या दोन गोष्टींची भर पडली. त्यामुळे एक बंदर आणि व्यावसायिक केंद्र म्हणून शहराचा विकास झाला. शहरातील कापड गिरण्या आणि नव्याने सुरू झालेले मुंबई विद्यापीठ यांमुळे शहराकडे येणारे लोंढे वाढत होते. त्यातच जगाच्या दुसऱ्या टोकाला, अमेरिकेत १८६१ मध्ये सुरू झालेल्या नागरी युद्धामुळे भारतातील कापडाची मागणी खूपच वाढली. याचा परिणाम एकंदरीत शहराच्या वाढीवर न होता, तरच नवल! १८२६ मध्ये केवळ १,६२,५७० एवढीच असलेली या शहराची लोकसंख्या १८७२ मध्ये, म्हणजेच केवळ ४६ वर्षांच्या कालावधीत ६,४४,४०५ एवढी वाढली. एकेकाळी मलेरिया, ताप यांचे शहर अशी ओळख असलेली मुंबई हळूहळू कात टाकत होती.
मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता १८७४ साली बाँम्बे ट्रॅम अँक्ट मंजूर होऊन `बाँम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रँमवेज कंपनी"कडे दोनशे घोडे व वीस ट्रॅमगाड्या आल्या. १९२० साली दुमजली ट्रॅम गाड्या मुंबईच्या रस्त्यांवरून धावू लागल्या होत्या.ट्रॅम वाहतुकीच्या पाहणीत १९१३ साली रिमिंग्टन या अधिकार्याने मुंबईत ट्राँली बस आणायची सूचना केली होती. १९२६ पर्यंत याबाबत काहीही हालचाल झाली नाही. डारडिंपल नावाच्या साहेबाने मात्र जोर लावल्यामुळे मुंबईत ट्राँली बस आणावी की मोटारबस यावर पुन्हा एकदा चर्चा झडली. शेवटी पहिली बस १५ जुलै १९२६ या दिवसापासून प्रायोगिक तत्वावर मुंबईमध्ये पहिली मोटारबस धावू लागली. हे अंतर पार करायला बसला फक्त १० मिनिटे लागत. दादर टीटीपासून पारशी काँलनीतून किंग्ज सर्कलपर्यंत, आँपेरा हाऊसपासून लँमिंग्टन रोडपर्यंत असे त्या मोटारबसचे काही मार्ग होते. मोटारबस सुरु झाल्यानंतर मुंबईकरांमध्ये ती लवकरच लोकप्रिय झाली. मुंबईकरांनी या सेवेचे जोरदार स्वागत केले पण तेव्हा बेस्टची बससेवा उच्च मध्यमवर्गीयांसाठीच आहे असे मानले जाई. असत कारण ट्राम हेच प्रवासाचे स्वस्त साधन होते. म्हणून मुंबईने बससेवा पूर्णपणे आत्मसात करायला वेळ लागला. तोपर्यंत मुंबईत टॅक्सी हे भाड्याचे वाहन रूढ झाले होते. ३१ डिसेंबर १९२६पर्यंत बाँम्बे इलेक्ट्रिकल सप्लाय अँड ट्रॅम कंपनीकडे २४ बसगाड्या झाल्या होत्या. १९२७ सालपर्यंत मुंबईत ४९ लाख प्रवाशांनी या बससेवेचा फायदा घेतलेला होता.
सरकार आणि महानगरपालिका यांच्या विनंतीवरून बेस्ट ने उत्तर मुंबईत आपली सेवा सुरू केली. आणि वाढत्या गर्दीची गरज ओळखून डबलडेकर बस १९३७ मध्ये सुरू झाल्या. त्याकाळी सिंगलडेकर बसमध्ये ३६ प्रवाशांची सोय होत असे. मात्र डबलडेकर बसमध्ये ५८ प्रवासी बसू लागले. दुसर्या महायुद्धाच्या काळात अपरिहार्यता म्हणून बेस्टने सिंगलडेकर गाड्यांच्या टपावर बसण्याची सोय केली. या बसमधून ६० प्रवासी जाऊ शकत. मात्र उन्हाळा व पावसाच्या काळात टपावरील प्रवाशांना बसायला त्रास होऊ लागल्याने हळूहळू ही सुविधा बंद करण्यात आली.मुंबईतील प्रवाशांची वाढती संख्या व कमी बसेस यामुळे प्रवाशांची गर्दी वाढत होती. त्यातून मार्यामार्याही होत असत. म्हणून बेस्ट प्रशासनाला शेवटी बसमध्ये प्रवेश करणार्या प्रवाशांच्या संख्येवर मर्यादा आणणारा कायदा करावा लागला.
छोट्या अंतराच्या प्रवाशांना रांगेमध्ये ताटकळत उभे राहावे लागू नये म्हणून १९६७ साली बेस्टने आँल स्टॅंडिंग बसचा प्रयोग केला. या बसमध्ये मोकळ्या जागांच्या व्यतिरिक्त सर्व प्रवासी उभे राहात. पण ही बस लोकांना आवडली नाही. लोक तिला बकरा गाडी म्हणूलागले. ही बस १९७०मध्ये बंद झाली. पहिली "लिमिटेड" बस १९४० मध्ये कुलाबा ते दादर धावली. दुसर्‍या महायुद्धानंतर ७ ऑगस्ट १९४७ च्या दिवशी "बेस्ट" मुंबई महानगरपालिकेत सामावून घेण्यात आली कालांतराने बॉम्बे चे मुंबई झाले म्हणून "बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय And ट्रान्स्पोर्ट" च नाव बदलून "बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय And ट्रान्स्पोर्ट" असे ठेवण्यात आले. बेस्ट देशातील सर्वात मोठी शहर रस्ता वाहतूक कंपनी आहे. बेस्टचा आदर्श घेऊन देशातील अनेक शहरांनी स्थानिक बस सेवा सुरू केली. मात्र वाहतुकीबरोबरच वीज पुरवठा सेवा पुरवणारी बेस्ट ही एकमेव संस्था. मुंबई महापालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या बरोबरीने बेस्टचा वेगळा अर्थसंकल्प मांडला जातो. तो शिलकीच असतो, हे महत्वाचे.

सध्या काही नालायक, स्वार्थी राजकारणी स्वत:च्या व भांडवलदारांच्या स्वार्थाकरीता ‘बेस्ट' जाणूण बूजूनबंद पाडू पाहत आहेत. आता आपण तमाम मुंबईकरांनी एकत्र येऊन ‘बेस्ट' वाचवलीच पाहीजे. ‘बेस्ट‘ ही मुंबईची शान होती, आहे आणि यापुढेही ती तशीच अबाधीत राहीलीच पाहिजे.


मिलिंद आरोलकर .

Thursday, 1 July 2021

चाळीतल "बिऱ्हाड"....

                       चाळीतल "बिऱ्हाड"...

पूर्वी मुंबईत जेव्हा चाळ संस्कृती होती तेव्हा तिथे राहणाऱ्या कुटुंबांना "बिऱ्हाड" म्हणत. अशी अनेक "बिऱ्हाडं" त्या चाळींमधून दाटीवाटीने रहात असत.

खोल्यांचा आकार स्क्वेअर फुटात मोजायची पद्धत तेव्हा रूढ नव्हती. तेव्हा त्या लहान लहान सिंगल आणि डबल रूम म्हणजे घरं होती. त्यात राहणाऱ्या लोकांचीच नाही तर चाळीतील सर्वांची.

अनेकदा अनेक घरांना वर्षानुवर्षे कुलूप लागत नसे. एकतर घरात इतकी लोकं असत की कोणी ना कोणीतरी घरात सदैव असे. तसेच कोणीच नसेल तेव्हा कुलूप लावण्यापेक्षा "वहिनी / काका मी जरा बाजारात जाऊन येते आहे. जरा लक्ष ठेवा."
इतके शेजाऱ्याना सांगून दार सत्ताड उघडे टाकून जाण्याइतपत विश्वास असलेला शेजार तेव्हा होता.

वर्षानुवर्षे, दोनेक पिढ्या एकत्र राहिलेली, फक्त सिंगल विटांच्या भिंतीने वेगळी असलेली अनेक लोकं "चाळकरी'  नामक एका मोठ्या कुटुंबाचा भाग होती!

हळूहळू फ्लॅट संस्कृती बोकाळू लागली. गरज, चैन, दिखावा अश्या विविध कारणांनी लोकं मुंबई सोडून उपनगरात जाऊ लागली.

मग एखाद्या सकाळी चाळीच्या दाराजवळ एक ट्रक लागायचा. 'अमुक एक बिऱ्हाड चाळ सोडून जातंय...' अशी खबर यायची. चाळीतील तमाम मंडळी सार्वजनिक गॅलरीत उभी राहून "बिऱ्हाड जाण्याचा" कार्यक्रम बघत असायची.

कामाला आलेले हमाल एकेक कपाट, पलंग, खुर्च्या, टेबल्स, भांडीकुंडी, खेळणी, कपडे अश्या वस्तू जिन्यावरून उतरवत ट्रक मध्ये मांडून ठेवायला सुरुवात करत. त्यातील कित्येक भांडी कित्येकदा चाळीतील अनेकांच्या घरात काहीतरी गोडधोड भरून आलेली असायची. एखादी बॅग किंवा खेळणं एखाद्या वाढदिवस किंवा लग्नात चाळकऱ्यानीच भेट दिलेलं असायचं!

हळूहळू घर रिकामं व्हायचं. भिंतीवर, छतावर आणि जमिनीवर त्या कुटुंबाच्या वास्तव्याच्या अनेक खुणा दाखवत असलेलं ते घर आता एक भकास खोली बनून राहायचं. त्या घरात खेळलेली मुले, गप्पा आणि चहाड्यांचे फड जमवलेल्या शेजारणी, गणपतीच्या आरतीत चुरशीने देवे म्हणलेली तरुण पोरे त्या घराचे काही तासात संपलेले अस्तित्व चाळीच्या कठड्यावर हनुवटी टेकवून बघत राहायची.

ट्रक भरला की ते कुटुंब सर्वांचा निरोप घ्यायला यायचे. इतका वेळ धरून ठेवलेले भावनांचे बांध फुटायचे. एकमेकांना मिठ्या मारून -

"रविवारी, गणपतीला भेटूच..... फार लांब नाहीये..... ट्रेनने तासभर आणि स्टेशन पासून चालत दहा मिनिटे..... नक्की या, येऊ....! काळजी घ्या रे बाबांनो....!" अश्या प्रकारचे संवाद व्हायचे.

कुटुंब त्याच ट्रकमध्ये बसून सर्वांना शेवटचा टाटा करून काळाच्या ओघात गुडुप व्हायला निघून जायचे. चाळीतील उरलेले आपापल्या आयुष्यात गर्क व्हायचे. त्या खोलीत मग एखादे नवे बिऱ्हाड यायचे. त्या खोलीचा कायापालट व्हायचा.

अशी बिऱ्हाडं येत जात राहायची. पण मूळ रहिवाश्यांशी असलेलं ते नातं परत क्वचितच तयार व्हायचं!

आजही ती माणसं मनात घर करून आहेत. अनेक वर्षांपूर्वी जाताना जशी दिसायची तीच छबी अजून मनाच्या एका कोपऱ्यात कोरलेली आहे. काळ पुढे सरकला तरी खुणा मागे ठेवून गेला आहे!

बिऱ्हाडं केव्हाच गेली असली तरी त्यांच्या आता थोड्याश्या अंधुक झालेल्या आठवणी आजही मनात "बिऱ्हाड" थाटून आहेत!


मिलिंद आरोलकर. 

मुंबईतला गिरणी कामगार

गिरणी कामगार मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. कधी काळी मोठ्या प्रमाणात असलेल्या कापड गिरण्यांच्या बळावरच मुंबईला ही ओळख मिळाली. गिरणीचा भोंगा...