Friday 27 August 2021

‘सफरचंद’ नावाची उत्पत्ती.


‘सफरचंद’ नावाची उत्पत्ती.

‘सफरचंद’ या शब्दाच्या उच्चारात ताज्या रसरशीत सफरचंदाचा तुकडा दातांनी तोडताना जो विशिष्ट आवाज होतो तसा एक नाद आहे. हा शब्द कोठून आला असेल याचे मला नेहमी कुतूहल वाटे. कारण फारशी भाषेत सफरचंदाला 'सेब' असे नाव आहे. हिंदी उर्दू मध्येही सेबच म्हणतात. मग एखाद्या ढेरपोट्या गोबऱ्या गालाच्या शेटजीला शोभावं असं हे 'सफरचंद' नाव आलं कुठून असावं असा प्रश्न मलाच काय अनेकांना अनेक वेळा पडलेला आहे. त्याचं उत्तर अचानकच सापडलं. 
मदिना शहरी सौदी अरेबियात. तिथल्या एका मॉलमध्ये 'सफरजल' या नावाच्या पाटीखाली पेअरसारखी पिवळी फळं मांडून ठेवलेली पहावयास मिळतात. . पण ती काही सफरचंदं नाहीत . त्या रसरशीत पिवळ्या लवदार त्वचेच्या फळांना आपल्याकडे ‘बिही’ असे म्हणतात असे पुढे समजले. थोडीफार नाशपतीसारखी दिसणारी ही फळं पण आपल्याकडच्या सफरचंदाच्या जवळचं वाटावं असं ‘सफरजल’ हे नाव त्या फळांना होतं. आपण ज्याला ‘सफरचंद’ म्हणतो त्याला मात्र अरबीत 'तुफैहा' असं नाव आहे. मग सफरचंद हे नाव आलं कुठून ? सफरचंदाला गुजराती लोक 'सफरजन' म्हणतात. हे सफरजल नावाच्या अगदी जवळ जाणारं नाव. माझ्यामते गुजराती व्यापाऱ्यांनी हे नाव उचललं असावं. गुजरात्यांनी हे नाव त्यांच्या सुरत वैगेरे बंदरांवरून मध्यपूर्वेच्या प्रदेशांशी चालणाऱ्या अरबी व्यापाऱ्यांकडून ऐकलेलं असू शकेल. या फळांची बंदरांवरून आवक-जावक असावी. किंवा सुरतेवरून हजयात्रेसाठी जाणं-येणं करणाऱ्या यात्रेकरूंनी हि फळं नावासकट प्रसिद्ध केली असावी. मोहम्मद पैगंबरांनी सफरजन फळांची महती सांगणाऱ्या हदीस प्रसिद्ध आहेत. सफरचंदची फळं भारतात जेव्हा सर्वदूर पोहोचली तेव्हा गुजरात्यांनी आधीचाच 'सफरजन' हा शब्द त्यासाठी वापरात घेतला. मराठी लोकांनी गुजराती 'सफरजन' चे शेठीया नावाच्या जवळ जाणारे रूपांतर करून 'सफरचंद' केले. रायचंद, हिराचंद, लखीचंद सारखे सफरचंद. 

जगात सर्वप्रथम सफरचंदं माहित होती आणि त्यांची लागवड केली जात होती ती कज़ाख़िस्तानाच्या डोंगराळ भागात. तिथून हे फळ जगभर पसरले. तिथल्या स्थानिक कीटकांनी परागण करून इतक्या वेगवेगळ्या जातीची सफरचंदं या प्रदेशात उत्पन्न केली आहेत कि संशोधक आजही नव्या सफरचंदाच्या जातीच्या शोधात या प्रदेशात फिरत असतात. हे प्राचीन फळ आहे. सफरचंद हे ज्ञानवृक्षाचं फळ म्हणून प्रसिद्ध. बायबलमध्ये परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध आदम आणि इव्ह हे फळ खातात आणि स्वर्गातून हाकलून दिले जातात अशी कथा आहे.
 
आपल्याकडे काश्मीरमध्ये सफरचंदं होती पण भारतभर हि फळं कुणाला जास्ती माहिती नव्हती. काश्मीरात सफरचंदं होती पण ती जंगली जातीची. ब्रिटिशांनी हौसेनं आणून सफरचंदांची रोपं रुजवलेली पण ब्रिटिशांना आवडणारी सफरचंदं आंबट असल्यामुळे ती इतकी प्रसार पावली नाहीत. सफरचंदं भारतभर इतकी सर्वज्ञात झाली त्याचे श्रेय जाते सॅम्युएल स्टोक्स या अमेरिकन भारतीयास. 

या स्टोक्सची कहाणी सफरचंदाच्या व्युत्पत्तीपेक्षाही रोचक आहे. वयाच्या विसाव्या वर्षी एका श्रीमंत अमेरिकन उद्योगपतीचा हा मुलगा भारतात स्वतःचा अध्यात्मिक शोध घेण्यासाठी आला. शिमल्यात राहून कुष्ठरोग्यांची सेवा केली. तिथले अठरा विश्वे दारिद्र्य, अन्नान दशा पाहून त्या लोकांसाठी काहीतरी करायचे ठरवले. अमेरिकेत सफरचंदाच्या लागवडीसाठी जसे पोषक हवामान आहे तसेच ते शिमल्याच्या आसपासही आहे हे स्टोक्सच्या लक्ष्यात आले आणि इथे उत्तम आणि मोठ्या प्रमाणात सफरचंदाची लागवड केली जाऊ शकते आणि तसे झाले पाहिजे हा ध्यासच स्टोक्सने घेतला. तो अमेरिकेला गेला आणि फिलाडेल्फीयाहुन उत्तमोत्तम सफरचंदांची रोपं घेऊन भारतात परतला. आधी स्वतः लागवड केली आणि ती रोपं हळूहळू सर्व हिमाचल प्रदेशात प्रसार पावली. आज भारत सफरचंदांची निर्यात करणारा मोठा देश आहे. डोंगराळ प्रदेशातल्या लोकांची गरिबी दूर करण्यात स्टोक्सचा वाटा थोर आहे. 

पुढे स्टोक्सने गांधीजींच्या प्रेरणेने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. सत्यानंद हे नाव स्वीकारले आणि या मातीतल्या लोकांसाठी काम करत देह ठेवला. अमेरिकेने भारतास दिलेला आणि पुढे अस्सल भारतीय झालेला हा जॉनी ऍपलसीड आहे. या सत्यानंद स्टोक्सची परवा जयंती होती त्यांना आणि त्यांच्या कार्याला सलाम.



मिलिंद आरोलकर.

फोटो स्त्रोत गुगल -

Wednesday 25 August 2021

डालड्याचा शोध एका मराठी माणसाने लावला होता.




फोटो स्त्रोत गुगल -

डालड्याचा शोध एका मराठी माणसाने लावला होता.


डालडा सगळ्यानाच माहित आहे. एकेकाळी हे पिवळे डब्बे प्रत्येकाच्या घरात दिसायचे. साजूक तुपाचा सबस्टीट्युट असलेला हा डालडा मोकळा झाल्यावर भरपूर कामासाठी उपयोगी पडायचा. तो आपल्या जेवणाशी आणि जीवनाशी एवढा जोडला गेला होता की डालडा हा एक ब्रँड आहे आणि पदार्थाच नाव वनस्पती तूप आहे हे आपण विसरूनच गेलो होतो.

हो वनस्पती तूप. एकेकाळी याच वनस्पती तूपाने अख्ख्या दुसऱ्या महायुद्धात सैनिकांना जगवल होतं. पण गंमत अशी की आपल्या पैकी प्रत्येकाला वाटत की हे वनस्पती तूप परदेशात शोधलं गेलंय. तर तस नाही. वनस्पती तुपाचा शोध एका मराठी माणसाने लावला आहे.

नारायणराव बाळाजी भागवत.

भागवत घराणे हे मुळचे पंढरपूरचे. घरात अगदी गर्भश्रीमंती होती. पण नारायणरावांचे वडील त्यांच्या वडिलांशी भांडून निराधार अवस्थेत मुंबईस आले. तिथेच हमाली वगैरे करून शिक्षण घेतल. मट्रीकच्या परीक्षेवेळी कष्टाने त्यांना मानाची ‘जगन्नाथ शंकरशेठ’ शिष्यवृत्ती मिळाली. आपल्या मेहनतीने शिक्षण पूर्ण करून ते वकील झाले. नंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. नंतर बाळाजी भागवत इंदोरच्या होळकर संस्थानचे दिवान बनले.

बाळाजी भागवतांची पत्नी ही त्या काळातली म्हणजे एकोणिसाव्या शतकातली मॅट्रिक होती आणि इंग्रजी पुस्तके वाचणे हा तिचा छंद होता.

अशा सुशिक्षित माता-पित्यांच्या पोटी नारायणरावांचा जन्म १८८६ मध्ये झाला. नारायणराव व त्यांची भावंडे अभ्यासात हुशार होते. नारायणरावांनादेखील आपल्या वडिलांच्या प्रमाणे ‘जगन्नाथ शंकरशेठ’ स्कॉलरशिप मिळवायची होती. त्यासाठी ते संस्कृत भाषेचा अभ्यास फार जोमाने करत होते. पण त्यांच्याच एका आप्ताने त्यांना सांगितले,

‘नारायणा, तुझी आíथक स्थिती उत्तम आहे, तुझे शिक्षण तुझे आई-वडील सहज करू शकतात. त्यामुळे उगीचच जगन्नाथ शंकरशेठ मिळवून तू दुस-या एका हुशार पण गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशाअभावी अडवू नकोस आणि जो काही अभ्यास करशील तो आनंदासाठी कर, काही मिळवायचे असे ध्येय ठरवून करू नकोस’

हा सल्ला नारायणरावांना जन्मभर मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरला. नारायणराव भागवतांनी मुंबईच्या झेवियर्स कॉलेजमधून रसायनशास्त्रात डिग्री घेतली. याच काळात सर जमशेदजी टाटांच्या संकल्पनेतून कर्नाटकातील बेंगलोरमध्ये ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ची स्थापना झाली होती.

भारतातील हे पहिले मुलभूत संशोधन केंद्र होते. नारायणरावांनी तिथल्या पहिल्याच बॅचमध्ये प्रवेश घेतला. रसायनशास्त्रात त्यांनी ऑईल्स आणि फॅट्स यावर संशोधन केले.

ते टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सची संशोधन पदवी पूर्ण करणारे पहिले विद्यार्थी ठरले. त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या भावाने देखील याच संस्थेत प्रवेश घेतला.

पासआउट झाल्यावर नारायणराव येमेन देशातील एडनला गेले. तिथे त्यांच्या वडिलांच्या मित्राचा इब्राहीमभाई लालजी यांचा साबणाचा कारखाना होता. तिथे त्यांना मदत करण्यास सुरवात केली. त्यांच्याच घरात त्यांच्या मुलासारखे राहिले.

पुढे १९१९ मध्ये पत्नीचे निधन झाल्यावर ते भारतात परत आले. भारतात आल्यावर टाटा ऑईल मिल्स येथे कंपनीचे डायरेक्टर कपिलराम वकील यांचे मुख्य मदतनीस म्हणून ते नोकरी करू लागले.

पहिल्या महायुद्धाचा हा काळ होता. सैनिकांना लोण्याची आवश्यकता असायची. पण ते सर्वाना पुरवण शक्य नव्हतं. थिजवलेल्या तेलापासून लोण्याचा स्वस्त पर्याय म्हणून मार्गारीन सैन्यात वापरायला लागले. ते लोकप्रिय झाले व ते स्वस्त असल्यामुळे मागणी वाढत गेली.

पण भारतीय सैनिकाकडून मात्र या मार्गारीन पेक्षा तुपाची मागणी जास्त व्हायची.

याच काळात जगभरातील संशोधक साजूक तुपाला पर्याय शोधण्याच्या मागे लागले होते. विशेषतः अमेरिका व जपान मध्ये गोडेतेलापासून तूप तयार करण्याचे प्रयत्न सुरू होते, पण त्यांना यश मिळत नव्हते. पण टाटा कंपनीमध्ये नारायणराव भागवत आणि कपिलराम या दोघांनी त्यात यश मिळवले.

पहिले नैसर्गिक तूप भारतात तयार झाले.

ही गोष्ट टाटा कंपनीचे वित्तीय सल्लागार असलेल्या पीटरसन या गोऱ्या अधिका-याला कळली. त्याने या कृतीची मागणी त्यांच्याकडे केली. पण भागवत आणि कपिलराम उत्तरले,

‘‘या क्षेत्रात आम्ही शोधकर्ते ठरलो आहोत तर मग त्याचा फायदा आमच्या देशालाच झाला पाहिजे. आमच्या देशालाच त्याचे श्रेय मिळायला हवे’’.

इंग्रजांच्या सत्तेचा काळ होता. आपण ज्यांच्यावर राज्य करतो ते भारतीय लोक आपली आज्ञा मानत नाहीत याचा राग त्या पीटरसनच्या मनात आला. त्याने थेट टाटांच्या या कंपनीची आर्थिक नाकेबंदी केली. टाटांना ही कंपनी बंद करावी लागली.

कपिलराम आणि नारायणराव दोघेही बेकार झाले. जवळपास सातवर्ष नारायणराव बेकार होते. अमेरिकेतील एक अतिशय चांगल्या पगाराची नोकरी त्यांना चालून आली होती पण ‘वनस्पती तुपाच्या’ शोधाचे श्रेय त्यांना आपल्या देशालाच द्यायचे या हट्टापायी त्यांनी नाकारली.

याकाळात त्यांच्या एका बहिणीने आपल्या शिक्षिकेच्या नोकरीतून त्यांच अख्खं कुटुंब संभाळल.

अखेर सात वर्षानी कपिलराम यांनी गुजरातमध्ये सॉल्ट कंपनी सुरु केली व नारायणरावांना तिथे नोकरी मिळाली. या दोघांच्या जोडीने तिथेही रसायनशास्त्रात अनेक महत्त्वाचे शोध लावले. पुढे ही कपिलराम यांची कंपनी टाटांनी विकत घेतली आणि तिचे नाव ठेवलं

‘टाटा केमिकल्स’. टाटा केमिकल्सची मुख्य जबाबदारी कपिलराम आणि नारायणराव यांच्याकडेच होती.

सर्व घडी नीट बसलेली असतानाच अचानक नारायणरावांना गुजरात सोडून परत यावं लागलं. त्याच्या वडिलांना पॅरालीसीसचा झटका आला होता. मुंबईत येऊन त्यांनी आपले मित्र अनंतराव पटवर्धन यांच्याबरोबरसाबण आणि बाकीच्या कंपन्यांना लागणारी केमिकल्स बनवणारी ‘अनार अँड कंपनी’ सुरू केली.

याच काळात लिव्हर ब्रदर्सनी भारतात हिंदुस्तान वनस्पती मॅन्युफ्कचरिंग नावाची कंपनी स्थापन केली होती.

त्यांनी डाडा या डच कंपनीबरोबर करार केला आणि भारतात सेवर येथे वनस्पती तूप बनवणारी फॅक्ट्री सुरु केली. हे वर्ष होतं १९३७. पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना संपूर्ण जगभरात वनस्पती तूप पाठवण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि तिथून वनस्पती तूप म्हणजे डालडा हा अगदी समानार्थी शब्द पडून गेला,
वनस्पती तुपाचा शोध नारायणराव भागवत यांनी लावला होता हे जगाबरोबरच आपण ही विसरून गेलो.

नारायण राव भागवतांच्या मुलीनीही त्यांच्या घरची उच्च शिक्षणाची परंपरा पुढे नेली. त्यांच्या दोन्ही मुली म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका दुर्गा भागवत आणि भारतातल्या पहिल्या डॉक्टरेट मिळवणाऱ्या कमलाबाई भागवत सोहनी. त्यांच्या रूपाने भागवत कुटुंबाच नाव अजरामर राहिले आहे.




मिलिंद आरोलकर -

फोटो स्त्रोत गुगल -

Sunday 15 August 2021

लग्नासाठी मोठ्या अपेक्षा मुलींच्या.




मुलीचे पालक :- पगार किती आहे?,
स्वत:चे घर आहे का?
गावी शेती आहे का? 
कार आहे का ?,
अजून कुठे इन्व्हेस्टमेंट केली आहे का?
बहिणींची लग्न झाली आहेत का?
आई-वडिल कुठे असतात ?

मुलगा : मुलगी काय करते ?

 मुलीचे पालक  : डिग्री झालीये नोकरी शोधत आहे, 
डिप्लोमा कोर्स करतीये ,
आधी करत होती ,
लग्नाचं चाललय म्हणून सोडलंय, आता २- ३ महिन्यात
लगेलच ऑफिस लांब पडतय
 म्हणून सोडलाय, घरीच असते तिला गृहसजावटीच्या 
आवड आहे .

 मुलगा  :- *मग तुम्ही अस स्थळ का नाही शोधत* जो मुलगा नोकरी शोधतोय किंव्हा ज्याला पुढे लागणार आहे? 
काका एक साधी गोष्ट आहे 
जर मुलाकडे नोकरी,
घर,
शेती, 
गाडी नसेल तर तुम्ही *तुमची मुलगी द्याल का?*

 नाही ना ?
तर मग  मुलीकडे काहीही नसताना मुलाने का करावे अशा मुलीशी लग्न? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 
पगार माझा ,
घर माझं ,
शेती माझी,
कार माझी,
कष्ट माझे,
इन्व्हेस्टमेंट माझी.
मी काय मूर्ख आहे काय तुमच्या मुलीला फुकट पोसायला.
पूर्वीचा जमाना गेला काका जेव्हा पुर्वीचे लोक हुंडा द्यायचे व 
घ्यायचे,
आता जमाना बदललाय ,
तुम्ही तुमच्या स्वप्‍नातल्या अपेक्षा बदला आणि 
हो महत्त्वाचे म्हणजे तुमची मुलगी घरी येऊन काय
 आयत्या पिठावर रेघोट्या 
मारनार का?
मुलीची बाजु म्हटले की 

 लग्नानंतर करेल की ,
शिकेल की ,
होईल की,
जमेल की,
 लागेल की,
बघु की.

पण तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मुलगा मात्र रेडीमेड तयार पाहिजे,
कुठेही कमी नको,
असं कसं चालेल काका.
साधी गोष्ट आहे काका तुम्हाला जसे सर्वगुणसंपन्न मुलगा हवाय मग मुलाकडचे ही सर्वगुण संपन्न मुलगीच बघणार ना.

मुलीं कडच्यांना अजूनही कळत नाहीये कि लग्नाचे स्वरूप बदलत्या काळानुसार पूर्णपणे बदलले आहे. ते अजूनही मुलगी द्यावी श्रीमंत घरी
आणि सून आणावी गरीब घरची  या आधारावर स्थळे शोधात आहेत आणि याउलट 
मुलाकडील अगदी 
प्रैक्टिकल विचार करून ,
 जो कष्ट करतो त्याच्याच घरी लक्ष्मी वास करते  या आधारावर स्थळे 
शोधात आहेत. 
समोरून चालून आलेले स्थळ 
मुलींकडचे युद्धाट उत्तर देऊन नकार देताहेत का तर कोणीतरी
 करोडपती/श्रीमंत स्थळ येऊन माझ्या मुलीला येऊन घेऊन जाणार आहे 
आशा 'स्वप्नांच्या दुनियेत अजूनही आहेत. 
मुली आणि त्यांचा पालक भारी-भारी श्रीमंत वेल-सेटल स्थळ शोधून काढतायेत आणि फोन करतात जेन करून मुलीला पुढे कोणतेही त्रास नको.

मुलाकडील फक्त आणि 
फक्त मुलींबद्दल विचारणा करतात आणि मुलींकडच्या
  पगार,
घर,
शेती,
बहिणीची लग्न,
आई-वडिल कुठे असतात, ईन्वेस्टमेन्ट आणि अजून 
बरंच काही. 
मग मुलांनो व्यक्ती म्हणून तुम्हाला काय महत्त्व ? 
तुमचा उपयोग मग काय 
फक्त एटीएम मशीन का?
मुलांनो एक साधा गोष्ट आहे ,
जर तुम्हाला बारावीला 
चाळीस-पन्नास टक्के पडले तर 
पुढील शिक्षणासाठी चांगले कॉलेज मिळेल का? नाही ना?
 मुलींच काय आहे ना की स्वतःला पडलेत चाळीस-पन्नास टक्के 
आणि एडमिशन हवंय हार्वर्ड यूनिवर्सिटी मध्ये.

 मुलांनो खालील खर्चाचा 
कधी विचार केलाय का?

 १. शहरातील एक मुलाच्या
 शिक्षणाचा खर्चा 
(ग्रेजुएशन पर्यन्तच फक्त १२ + ४ ) इथून पुढे ,
कमीत कमी २० लाख. बाकीचे खर्चा अजून वेगळेच. जुळे झाले तर मग डबल धमाका.

२. आई-वडिलांचा (म्हातारपणात) आजाराचा खर्च
 (वाढत्या वयानुसार बीपी, शुगर, दातांच्या समस्या, संधिवात, डोळ्यांची दृष्टी, अजूनही काही गंभीर आजार व त्यांचा खर्च विचार न केलालाच बरा )  

३. मुलांच्या (लहान वयात) सर्दी,खोकला,ताप,आजाराचा खर्च, 
डायपरचा खर्च (कमीत कमी तीन वर्षभर दररोज), 
वर्षभरातील नियमित तपासणी.

४. बायकोच्या व स्वत:चा 
घरातील कार्यक्रम – 
नातेवाईकाचे लग्न (आहेर), 
लहान मुलांचे वाढदिवस (गिफ्ट् खर्च) , 
डोहाळजेवन , सुपारी कार्यक्रम ,गावाला जाणे येणे ,
 कार्यक्रमासाठी नवीन
 कपडे खरेदी आणि 
या सर्वांचा पेट्रोल ,टोलखर्च.

५. मित्रमैत्रिणीचे कार्यक्रम –
 लग्न (आहेर),
लहान मुलांचे वाढदिवस (गिफ्ट् खर्च) , 
डोहाळजेवन , 
सुपारी कार्यक्रम ला जाणे येणे , कार्यक्रमासाठी 
नवीन कपडे खरेदी आणि 
या सर्वांचा पेट्रोल ,टोलखर्च.

६. महिनाभराचा मोबाइल रिचार्ज' , डिश टीव्ही, कामवाली, महिनाभराचा बाजार, पेट्रोल ,सोसायटी मेण्टेनन्स.

७. साधे बाहेर जेवायला बसले तर एक हजार रुपये पुरत नाहीत.

८. घराचे हफ्ते कमीत कमी 
२० वर्षे ते पण नोकरी असेल तोपर्यंत.
 
बघितले ना सगळी अवघड कामे मुलाकडे आणि
*मुलींकडच्याना हे सगळं सोपच वाटतंय,*

 महागाईचा आलेख
दिवसेंदिवस वाढतच चाललंय
  पण आमची मुलगी 
काहीच करणार नाही जे काही करायचं ते मुलगाच करेल. 
स्वत:चं घर हे मुलगाच घेणार, 
कार ही मुलगाच घेणार, 
मुलांच्या शिक्षणाचा खर्च 
 हे मुलगाच करणार ,
संसार मुलगाच करणार, 
का संसार फक्त मुलाचाच आहे का? 
*मग मुलगी घरी कायकरणार?*
 मुलींची आणि त्यांच्या पालकांची जी अपेक्षा आहे ना 
की श्रीमंत घरी जायचंय 
ते बंद करा मुलांनो , 
मुलींना झाडवरुन 
खाली उतरवणाचे काम तुमचे आहे
 
मुलांनो लक्षात ठेवा सगळ्या 
 चाव्या तुमच्या हातात आहेत
 आणि तुम्ही मूर्खासारखे 
खुप अवघड आहे म्हणून
 रडतबसलय.
तुमचीच शेती/कष्ट/कार/पगार/घर ,तुम्हालाच ठरवायचयं कि पुढे जायचंय कि नाही ,
आणि तुम्हाला घरी नवीन सदस्य आणायचाय ना मग तुम्हीच जास्त पारखले पाहिजे ना ?
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलींना घरी बसून खायची पद्धत बंद करा .
मुली बऱ्याच गोष्टीत आधुनिक झाल्यात ,
तुम्ही त्याच 
जुन्या जमान्यातअजून जगताय. मुलांनो जवळजवळ सगळ्याच मुलींना श्रीमंताच्या घरी जायचंय जरा लघु उद्योजक,
शेतकरी,
छोटे दुकान व्यापारी, 
कमी पगार असणारे इंजीनियर / डॉक्टर/वकील/रिसेप्शनिस्ट/ऑफिसबॉय/सेक्युरिटी गार्ड/ शिपाई यांच्याशी कोण लग्न करणार,का त्यांना मन/इच्छा नाही का.?
 
मुलींच्या अपेक्षा खुप वाढल्यात असे बोलुन चालणार नाही.
जो पर्यंत मुलेही त्यांच्या अपेक्षा वाढवत नाहीत ना आणि मुलींना स्पष्टपणे 
सांगत नाही ना की 
आम्ही आमच्याच लेव्हलचेच स्थळ पाहतोय /तुमच्या अपेक्षा खुप जास्त आहेत, 
तोपर्यंत हे असेच चालत राहील.
मुलांनो जर तुम्हांला नोकरी नसेल तर कोणी मुलगी देईल का?,
चांगला पगार नसेल तर 
कोणी मुलगी देईल का? 
जर तुमच्याकडे शेती नसेल तर कोणी मुलगी देईल का? 
जर तुमच्याकडे स्वतःचे घर नसेल तर कोणी मुलगी देईल का? 
मग मुलीकडेही या गोष्टी नसतील तर मग मुलानं का करावे आशा स्थळाशी लग्न?
मुलांनो त्यामुळे वेळीच जागे व्हा 
आणि मुलीकडचयांनाही 
कळू द्या कि चांगले स्थळ हवे असेल तर आपली आणि आपल्या मुलीचीही तेवढीच लायकी हवी. 

 *सर्वात महत्वाचे* 

लग्न करणाऱ्या मुलांना व
 मुलांच्या पालकांना एक
 नम्र विनंती स्वतःची 
*सर्वप्रॉपर्टी/शेतजमीन/ईन्वेस्टमेन्ट/आई- वडिलांचा पगार/पेन्शन बायोडाटा मधे अजिबात टाकु नये*
 किंवा सांगू नये,
फक्त मुलाचा पगार आणि राहते घर स्वतःचे आहे ऐवढेच सांगणे.
आज-काल दुष्प्रवृत्ति 
आणि सिज़नल मैरिज करणारे लोक खुप वाढत चालले आहेत,
लग्न फायनल झाल्यावर 
किंवा लग्न झाल्यानंतरच 
अशा गोष्टी शेअर करणे.
ते तुमच्यासाठी खुपखुप महत्वाचेआहे.
लक्षात ठेवा क्षणिक आनंद 
देणाऱ्या गोष्टीच जास्त
 दुःख देतात आणि एवढ सगळं मिळाल्यावर मुलगी घरी करणार काय ? 
याचा जरा आपण विचार करायला हवा.
या सगल्या गोष्टी तुम्ही 
जर सांगितल्या तर
 तुम्ही स्वतः मुलीला आयतं बसून खायच आमंत्रण देताय हे लक्षात ठेवा.


मिलिंद आरोलकर.

२३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन

२३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन २३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन. संपूर्ण जगभरात २३ एप्रिल रोजी 'जागतिक पुस्तक दिन' साजरा...