दरवर्षी जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात महाविद्यालयात स्नेहसंमेलने होतात.काही महाविद्यायालयांनी स्नेहसंमेलन म्हणजे नुसती " उठाठेव नि डोकेदुखी " बंद केली आहेत. त्यांनी खर म्हणजे अशा संस्कृती- उध्दारक कार्यक्षम शाळा - महाविद्यालयांचा आदर्श घ्यायला हवा , निदान कानठळ्या बसविणाऱ्या ह्दयविकाराचा तीव्र झटका आणणाऱ्या , गर्भातल्या बाळालाही घाबरवून सोडणाऱ्या डीजे चे कार्यक्रम वारंवार घ्यावेत . म्हणजे अकारण ज्ञान , विज्ञान , शिस्त , संस्कार आणि सुप्त कलागुणांना वाव सांस्कृतिक उपक्रम असल्या अनाठायी गप्पानां पूर्णविराम मिळेल.नाही तर अशा धांगडधिंगाणा छाप कार्यक्रमांना वाव कुठे मिळतो ? विद्यापीठ पातळीवर होणाऱ्या सांस्कृतिक स्पपर्धामध्ये एकांकिका , एकपात्री प्रयोग , सुगम संगीत ,चित्रकला,कोलाज यासारखे ज्याला साधना लागते असेच कार्यक्रम आणि स्पर्धा असतात.
पूर्वी स्नेहसंमेलने व्हायची,त्यामध्ये तर प्राध्यापकांच्या पुढाकाराने तीन अंकी नाटक महिना महिना तलीम घेऊन बसविले जायचे.
त्यात रंगभूमीला स्टेजवरचे आणि बँकस्टेजचे कलाकार निर्माण करण्याची क्षमता असायची.रंगभूमीची शिस्तही अशा मुलामुलींच्या अंगी बाणावली जायची .आपल्याला स्नेहसंमेलनाच्या एकांकिकेत एखादा रोल मिळावा , म्हणून महाविद्यालयात होणाऱ्या निवडचाचणीसाठीही जय्यत तयारी व्हायची. एकपात्री , सुगम संगीत गायन , नाट्यसंगीत अशा विविध गुणांचे दर्शन संमेलनामध्ये असायचे. त्याकलेबाबत मार्गदर्शन , अभ्यास , आणि कष्टपूर्वक तयारी हे अपरिहार्यच असे. स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा म्हणजे मर्मबंधातल्या आठवणींचा खजिना असे . काळाच्या ओघात हे सगळे कुठे लुप्त झाले,कळलेच नाही. आता विचारवंत नको , प्रमुख अतिथी म्हणून लोकप्रिय अभिनेता वा अभिनेत्री हवी असते. सगळ्या उपक्रमांचे कधी बारा वाजले ,हे लक्षातच आले नाही.
फारसे शास्त्रीय अधिष्ठान नसलेली उठवळ गाणी मोठ्या आवाजात वाजवायची. त्यावर स्टेज हादरवून सोडणारी नूत्ये करायची त्याला नूत्य म्हणता तरी येईल का हा प्रश्न पडतो. असतात ते आचकट विचकट चाळे आणि लोकांना कर्णबधीर करुन सोडायचे . अशा कार्यक्रमांच्या सादरीकरणात कला अजिबात अंगी नसते , एखाददुसरे नूत्य खरेच चित्रपटातील नूत्याहूनही सुंदर असू शकते . पण सरसकट पाहिले तर सावळागोंधळ नि धांगडधिंगाणा यासदरात मोडणारा सगळा प्रकार असतो. निदान ज्याला सूजनाची आणि साधनेची गरज एकाग्रता व कष्टाचे मोल द्यावे लागते असे काही सादर होताना अलिकडे दिसत नाही. म्हणजे " ती फुलराणी " किंवा " प्रेमा तुझा रंग कसा ? " यातील १० मिनिटांचा प्रवेश सादर करायचा तर उच्चारण ,पाठांतर ,वाचिक ,कायिक अभिनय ,आवाजातले आरोह - अवरोह ( चढ-उतार ) ,प्रेक्षकांना खिळवून ठेविल अशी नजर आणि मुद्राभिनय हे सगळे आले .त्यापेक्षा " झिंग झिंग झिंगाट " हे मोठया आवाजात लावायचे . नि एकानेच काय १०/२० जणांनी स्टेजतोड नाच करायचा हे कसे सोपे आहे ,छान आहे आनंद म्हणावा तर तो गाण्यातला आहे ,चमचमणाऱ्या रंगीबेरंगी प्रकाशझोतांचा , प्रकाशरेषांचा आहे ,थोडाफार नाचातला ही आहे सारे कसे झिंग आणणारे असते ,कसली मज्जा असते,जल्लोष असतो. ते ज्या आमच्यासारख्या अरसिकांना आवडत नाही , ते ओरडत असतात. स्नेहसंमेलनातला स्नेह संपला ,विविध गुणदर्शनातले गुणदर्शन संपले,गुण उधळण राहिली . पण अशा मतांना कस्पटासमान लेखले पाहिजे.
अलिकडे शाळांच्या स्नेहसंमेलनातसुध्दा ९/१० वर्षाच्या चिमुकल्या मुली " अप्सरा आली " किंवा "चोली के पिछे क्या है " अशा गाण्यावर नाचवले जाते आईवडिलांना त्याचे किती कौतुक चार शब्द बोलता नाही आले स्टेजवर तरी चालेल .पण गाण्यावर नाचता आले पाहिजे .ही मुलंमुली त्यालाच कलागुण समजत राहतात , आणि त्याच्या सूजनाच्या आणि साधनेच्या वाटाच बंद होतात. शाळांमध्ये तरी कलागुणांचे विकसन व्हावे असे उपक्रम व्हावेत कि नाही ? त्यासाठी वेळच नाही. गाणी वाजवायला वेळ लागत नाही ,गाण शिकायला वेळ लागतो . तरुण मंडळे ,राजकीय पक्ष संघटना इत्यादीसुध्दा धार्मिक झिंग आणणारे उपक्रम आणि रेकॉर्ड डान्स स्पर्धा चेच आयोजन करतात. नाहीतर माणसं गोळा कशी होणार.
हल्ली प्रोफेशनल काँलेजेसमध्ये वेलकम् , फेअरवेल असले कार्यक्रम अधूनमधून होत असतात. भरमसाठ वर्गणी वसूल करुन खानपान ,नूत्यधिंगाणा यात रात्र जागविणाऱ्या कार्यक्रमाची तयारी त्यात असते . अगदी महाविद्यालयातील टँँडिशनल डेज् मध्ये सुध्दा डीजेच्या जोडीला मद्य ही आले ,ही गोष्ट आता सर्वश्रुत झाली आहे.सर्वच चांगल्या उपक्रमाचे " वाजले कि बारा " म्हणायचे फक्त ,की भडक नि भव्य धिंगाणाग्रस्त उपक्रमांना हद्दपार करून छोटे पण कलासक्ती वूध्दींगत करणारे कार्यक्रम घ्यायचे ,हे अजूनही शाळा - महाविद्यालय यांच्या हातात आहे .त्यासाठी फक्त इच्छाशक्ती हवी !
मिलिंद आरोलकर.